अपेक्षा ............!!!!

Started by neeta, June 09, 2011, 03:56:42 PM

Previous topic - Next topic

neeta

अपेक्षा ............!!!!

नेहमी वाटत मला ,
मी काहीतरी चूक करावी ,
आणि तुझ्याकडून मला प्रेमळ शिक्षा मिळावी ....

झालेल्या जखमेवर माझ्या,
तुझ्याच मायेची फुंकर असावी ......

केलेल्या माझ्या हट्टाना ,
तूच पुरवण्याची आस असावी ...........

असेल दु:खात तेव्हा ,
तुझ्याच सोबतीची जोड असावी .. ......

न बोलता माझ्या वेदना ,
कधी तुही समजून जाव्या .......

तोल जाता माझा ,
सावरणारे हात तुझेच असावे ..........

माझ्या आठवणीत एकांतपणी,
कधी तुही रमावं............

मैत्रीच्या पलीकडे कधीतरी ,
तुही काही बोलावं ...............

आजहि मला ,
या अपेक्षांचा भास होतो
आणि न कळत तू त्या नेहमीप्रमाणे मोडतो ............


निता...........
२५/६/२०१०

Nitesh Joshi

LAY BHARI

khara prem pan ata milat nahiye ho tyachi apn KIMMAT lawawi lagte kay karnar  :(

vaishalichande

 :)hi
    ur poems r superurb
    i liked thm very much
    keep it up