स्वर्गातले फूल

Started by madhura, June 18, 2011, 09:02:09 PM

Previous topic - Next topic

madhura

स्वर्गातले एक फूल, पृथ्वीवर अवतरले
घेऊनी ओंजळीत त्याला, निरखून मी हसले
फुलावरील दवबिंदूंन्ने, हळूच मज पाहिले
हृदय वेडे माझे, त्या पाकळ्यांमध्येच हरविले

येताच घरी त्याला, खिडकीपाशी ठेविले
क्षणात माझे सारे, जिवनंच त्यास अर्पिले
विश्वसाच्या धाग्याने, त्याच्याशी खूप बोलले
दु:खाच्या काळ्या ढगांन्ना, मी वेडी साफ विसरले

होताच संध्याकाळ मात्र, " ते " फुलसुद्धा कोमेजले
अचानक आयुष्यात माझ्या, हे अघटित कसे घडले
पुन्हा एकदा त्याच्याकडे, सुन्न मनाने मी पाहिले
आयुष्याच्या या प्रवासात, पुन्हा मी मागे एकटी उरले.... पुन्हा मी मागे एकटी उरले..........

~ ~ ~ सुरज ~ ~ ~

athang

nicely rendered ..... कवितेत RYTHM असला म्हणजे वाचायला मजा येते