विडंबन-तोच चंद्रमा नभात

Started by madhura, June 18, 2011, 09:14:21 PM

Previous topic - Next topic

madhura

विडंबन-तोच चंद्रमा नभात
विडंबन-तोच चंद्रमा नभात

(कवियित्री शांता शेळके यांची क्षमा मागून)

मूळ कविता
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणॆ
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे?
मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फ़ुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी

शांता शेळके

विडंबन

तोच हातचा रिमोट तीच टी. व्ही. वाहिनी
एकांती मजसमीप तीच रोज दामिनी

कथानक तेचतेच रोज तेच पाहणे
चष्म्यांनी देखियले चित्र तेच देखणे
प्रेक्षकही तेचतेच त्याच आयावहिनी

सारे जरी ते तसेच स्टोरी आज ती कुठे?
नट तोच आज परी दामिनीच ती कुठे?
ती न नायिका जिवंत पांगल्या किती जणी

त्या पहिल्या नटीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फ़ुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
लिंक ये न ती जुळून भंगल्या कथेतुनी

gaurig