कल्प भास

Started by बाळासाहेब तानवडे, June 19, 2011, 05:52:30 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे



कल्प भास

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास||धृ||

नयनास भार होते. स्वप्नील कल्पनांचे.
तुज पाहता सख्या रे,जणू स्वप्न रूप  साचे.
मी मुरली रे कान्हाची,तू सुरांचा आभास||१||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.

बहरात यौवनाच्या, मी धुंद फुल व्हावे.
गंधित या फुलाने, तू स्वैर-भैर व्हावे.
ही पाकळी मिटावी,तुझा फुलारून श्वास||२||

सांगू कशी प्रिया मी, हे गोड कल्प भास.
मी प्रेमवेडी राधा, तू प्राणसखा खास.

गीतकार : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १९/०६/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/