“एकदा तर माझ्याकडे बघ....!!!” चारुदत्त अघोर

Started by charudutta_090, June 22, 2011, 10:31:48 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं
"एकदा तर माझ्याकडे बघ....!!!" चारुदत्त अघोर(८/६/११)
तुझं न बोलणं मला, खरंच गं समजत नाही,
माझं काय चुकलं,हे मलाच काही उमजत नाही;
पण अशी माझ्याशी कोरडी,नको गं वागूस,
चूप बसून मुके पणी,मनी सलतंय हे नको सांगूस;
तुला असं बघितलं कि काय सांगू काय होतं,
माझ्या साचल्या भावनांच्या आधणी,जमून साय होतं;
तीळतीळ जीव तुटतो गं,तुझ्या अश्या वागण्यानी,
काय नाही आजवर म्हटलं,तुझ्या कोणत्याही मागण्यांनी;
पण...मला अबोला नाही गं सहन होत,
इतके विचारात कुठला खरा,नाही गहन होत;
आजवर मला सर्व गृहीतच समजत आलेत,
पण कोणा कडूनही अपेक्षा न करता,सर्व सहन केलेत;
तूच माझी या खात्रीने,कोणी प्रेम करणारं मिळालं हे जाणवलं,
हे रखरखीत जीवन,थोडं चिंब ओलावी,दवून पाणावलं;
वाटलंच नाही कि कधी कोपर्यात लपणारा मी,जो होतो अस्मित;
किती बिनधास्त आजवर तू जुळल्यावर,झालो सदास्मित,
माझ्या मांसल,आक्रसल्या जीउणी,तूच आहे गं हास्य आणलं, 
पण आज हे कसं गं आपलं नाजूक नातं,तू ओढून ताणलं;
या निधड्या छाती,तूच नाही डोकावली तर ती,आहे गं निकामी,
या सुन्या बाहूत तूच नाही विसावली,तर ती आहे गं रिकामी;
का गं अशी दुरावातेस,हर हा क्षण युगापरी मुकलो,
पायी टोंगळी मिठावून विचारतो,सांग तरी गं मी काय चुकलो;
तूच म्हटलेलं न कि बेचैन वाटलं कधी तर,"माझ्याकडे पाहून जग",
त्या संपल्या आयुष्याला,श्वास द्यायला,एकदा तर माझ्याकडे बघ....!!!
चारुदत्त अघोर(८/६/११)