बुलंद आशा

Started by बाळासाहेब तानवडे, June 22, 2011, 08:30:07 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

बुलंद आशा

मलाही उंच आकाशात उडायच आहे,
पण पंखात बळ कोठून आणू?

मलाही उंच शिखरं गाठायची आहेत.
पण पायात बळ कोठून आणू?

त्यांना नशिबवान म्हणावं का?
जे आज उंच आकाशात भरार्‍या मारतात.

हो कारण त्यांचा आज चांगला आहे.
पण मी आज का निराश व्हावं?

कारण सगळेच दिवस सारखे नसतात.
उद्या माझ्याही पंखात वीज संचारेल.

माझ्याही पायात सामर्थ्य येईल.
कदाचित उद्या मी आकाशाला गवसणी घालेन.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २०/०६/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/

amoul

khupach chhan and positive attitude !! mastach

बाळासाहेब तानवडे

अमोल , प्रतिक्रियेबद्दल खुप धन्यवाद.