मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात...

Started by gajanan.chaudhary, June 25, 2011, 10:56:34 AM

Previous topic - Next topic

gajanan.chaudhary

मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात.
कुणी 'Orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात. प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात.
कारण सगळे विषय 'Chat' वरच संपलेले असतात.
मग 'Chat' वर भेटूच याचं 'Promise' होतं.
आणि संभाषणातून 'Sign out' केलं जातं.
'लाल' 'हिरव्या' दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला होतं.
घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं.
'Available'' आणि 'Busy' मध्ये
प्रत्येकाचा 'Status' घुटमळत राहतो.
आपणहून 'Add' केलेल्या मित्रापासून लपण्याकरिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो.
ताप आल्याचं आजकाल आईच्या आधी 'Facebook'ला कळतं. औषधापेक्षा 'Take Care'च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं.
मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net'ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.
'Chat'ला गप्पांनी आणि 'Smile'ना हास्यांनी 'Replace' करावं.
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं.
मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.
चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवूया. मैत्रीला 'Technology' पासून जपून ठेवूया.

Author Unknown


sanjiv_n007

uttam ,, 

real fact aahe,

face book & chat mule aapan sarv mitra apratyaksh ritya dur hot aahot.

mitranno pratyeksh gathi bheti ghya.


gaurig

apratim........
कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.
'Chat'ला गप्पांनी आणि 'Smile'ना हास्यांनी 'Replace' करावं.
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं.
मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.
चला तर पूर्वीचे दिवस पुन्हा अनुभवूया. मैत्रीला 'Technology' पासून जपून ठेवूया.

gaurig

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....

चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......
खुपच छान....

केदार मेहेंदळे


समोर  समोर बसून बोलायची सवयच  गेलीय.... 
मैत्री सुध्धा आता व्हर्चुअल झालीय.
फेसबुकचा कट्टा आता तोडायला  हवाय.....
बंद दुकानाचा कट्टा पुन्हा शोधायला हवाय.
टेक केअरच्या डोसेसनी आजारी वाटायला लागलय
मित्रांनी आता धावत येऊन भेटावस वाटायला लागलय


kedar M.....

harshalrane


Pravin5000

'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..

ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..



Mast yaar.