जाणीव

Started by किरण कुंभार, June 27, 2011, 03:08:09 PM

Previous topic - Next topic

किरण कुंभार

कधी कधी वाटते हे वास्तव नाही
कारण डोळ्यांना जे दिसते ते खरे वाटत नाही
म्हणून जखमेवरची खपली मी हळूच काढतो
आणि जखमांच्या धाग्यांनी वास्तवाला बांधून ठेवतो
यातना मला जाणीव देतात मी जिवंत असण्याची
पण हा शावचोस्वास मला खोटा वाटतो
मी सर्व सोडून पळण्याचा प्रय्तन करतो
पण नंतर मला दिसते मी तर त्याच दिशेला पळतो
ज्यांची ज्यांची मला गरज होती
तेच मला सोडून गेले
ज्यांचाशिवाय माझा दिवस उजाडत नव्हता
तेच  चेहरे  आता अनोळखी वाटतात 
कारण ते चेहरे नव्हते तर मुखवटे होते
आपलेपणा मागे लपलेले स्वार्थ होते   
म्हणे समय सर्वात मोठे औषध आहे
पण ते हि जणू काय लागू पडत नाही
स्मृतीवरचे डागही धुतले जात नाही
कधी कधी वाटते हा श्वास जणू थांबवा
नसा नसामध्ये  फिरणारा विषप्रवाह थांबवावा
पण हृदयाची धक धक हा विचार थांबवते
आणि पुन्हा आयुष्य एकदा हाक मारते
----- किरण कुंभार

   

sameer dalvi

भरपूर सुंदर आहे कविता.............
nice ......


gaurig