एकटेच शब्दं माझे

Started by sameer dalvi, June 28, 2011, 03:13:22 PM

Previous topic - Next topic

sameer dalvi

एकटेच शब्दं माझे, सोबतीला सूर नाही,
दाटले डोळ्यात अश्रू , पण आसवांचा पूर नाही.......

हाच आहे तो किनारा, येथेच होती भेट झाली,
अन संपली जेथे कहाणी, तोहि पत्थर दूर नाही........

तू जिथे असशील, पौर्णिमेचा चंद्र नांदो,
आंधळ्या या माझ्या नभाला, चांदण्यांचा नूर नाही.........

शांत आहे झोप माझी, अंतरी काहूर नाही,
दाटले डोळ्यात अश्रू, पण आसवांचा पूर नाही.....

तू नको पुष्पांस वाहू, माझिया थडग्यावरी,
थडग्यातला मृत गंध माझा, मी फुलांना आतुर नाही.......

मर जरी निष्प्राण झालो, आत्मा हा जागेल हा,
वार्यासवे  हरवून जाण्या, तो कुणी कापूर नाही................   

santoshi.world


gaurig