आयुष्याच्या बागेमधुनी...

Started by Tinkutinkle, June 29, 2011, 01:31:06 PM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

.
आयुष्याच्या बागेमधुनी
पाखरासारखे स्वच्छंद उडावे,
आनंदाचे मधुर क्षण सारे,
फुलपाखरासम अलवार टिपावे,
.
इंद्रधनुपरी रंग उधळावे
अन् पाऊस होऊन कधी बरसावे,
प्रत्येकाच्या जीवनी,अंतरी
निरागस,इवले फुल होऊनी,
सुगंध देत सदा दरवळावे,
सुगंध देत सदा दरवळावे.
.
-ट्विँकल
.

gaurig