"एक ती रात्र होती,"© चारुदत्त अघोर

Started by charudutta_090, June 29, 2011, 09:27:10 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"एक ती रात्र होती,"© चारुदत्त अघोर(२८/६/११)
एक ती रात्र होती,जी मला जागवत होती,
कारण नुसत्या विचारीच, तू दुरावली होती;
मी जे कधीच पचवू शकत नव्हतो,ते माझ्या वाटेला येत होतं,
इतकं कसं तुझ्यात एक झालो,जरी हे नातं जुळलेलं होतं,
मला माहित होतं कि हा, माझ्या मनाचा फक्त एक विचारच होतां,
जो भरल्या थंडीतही मला, चीम्म घामावून सोडत होतां;
नाही मी नाही जगू शकत,तुझ्या विना मन म्हणत होतं काळोखात डूब,
हि गुद्मर्ती गर्मी नको होती या थंडी,हवी होती तुझी गरम उब;
एकच विचार किती हादरवू शकतो,कि दुरावा किती असतो जीवघेणा,
निधड्या,बेधडक माणसालाही करू शकतो केविलवाणा;
पण,असा विचार मी का करतोय,हे घडलंच नाही जरी,
निष्कारण का डोकं कोरतोय,तू माझीच आहे तरी,
त्या खिडकीत उभा मी,पाटी उघडून थंड हवा घेतली,कारण होतो भिजलो,
क्षणात तुझ्या पांघरूणी घुसून,तुला मिठीत आवळून स्वस्थ निजलो...!!
चारुदत्त अघोर(२८/६/११)