"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" -गौरव पाटील

Started by Gaurav Patil, June 30, 2011, 03:11:07 PM

Previous topic - Next topic

Gaurav Patil

ही कविता कविवर्य श्री. मंगेश पाडगावकर यांना समर्पित करतोय. जमलच तर संदिपजींच्या स्टाइल मधे वाचा....

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
प्रेम अगदी दुधासारख पंधराशुभ्र असतं
जास्त तापवलं तर उत्तु जात असतं
आणि दुर्लक्ष केलं तर नासत असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
प्रेम अगदी पाडाला आलेला आंबा असतं
जरा लवकर कापला तर आंबट आंबट असतं
आणि जरा उशिरा कापला तर गोडगोड असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय असतं?
प्रेम म्हणजे काय हे कधी समजत नसतं
ते समजलं असतं तर तुमचं आमचं सेम नसतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं

                      -गौरव पाटील


gaurig