“तो मखमली क्षण शेवाळ”….© चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, July 04, 2011, 04:37:19 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"तो मखमली क्षण शेवाळ"....© चारुदत्त अघोर.(२५/६/११)
दूर एकदा मोटर सायकल वर,शहराच्या वेशी काठी,
थकून दोघंही आपण,बसलो वडाच्या झाड-खोडा पाठी;
त्या दिवशी तू जरा शांत होतीस,फक्त माझ्या कडे बघत,
मला काळत नव्हते,कारण नेहेमी सारखं प्रेम नव्हतं ओघत;
तू हि माझ्या पाठीलाच पाठ लाऊन टेकलीस,जरा अंतर्मुखी होऊन,
थोडी घालमेल माझीही होत होती,कारण चित्त गेली होतीस तू घेऊन;
जरा मी तरी तिरप्या नजरी,तुझ्याकडे पाहिलं,
होतं तुझं पापण कड,अश्रू धारी नाहिलं;
क्षणात मी उठून तुझ्या समोरि आलो,
विचलित मनी,तुझ्या पडत्या अश्रूत नाहिलो,
किती खोडून विचारल होतं, तुला काय झालं,
तू फक्त ओल्या डोळ्यांनी बघत म्हणालीस,होऊन गेलं;
"कारण.." मला कळलेच नाही,तुला खोदून विचारलं,
तू हुंद्कत म्हणालीस,काल कोणतं अंगी वारं संचारलं;
ओह्ह्ह...म्हणजे काल जे घडलं त्याकरिता तू रडतेस,
मी तुला जवळायचं बघतोय,अन तू तितकीच कडतेयस;
पुन्हा तुला मिठीत घेऊन मी छाती वर टेकवलं,
कालच्या प्रसंगी घडलं त्यांनी,माझंही मन शून्यात ऐकवलं,
पण अगं..तो क्षणाच असा होतां,ज्यांनी नकळतच तू आणि मी पाकावलो,
नियतीच्या वादळी वार्या झोकी,एकमेकावर मोहरून वाकावलो;
विसरून गेलो आपण कुठे आहोत,मी माझा नव्हतोच,ना तुझी तू ,
फक्त एक उर्जा होती दोघात,जी कामवून आगवली आणि झाली अस्तु;
जग जसं निसटत होतं,जणू सरकती रेती रवाळ,
पाय घसरून मिलनाउन गेला, "तो मखमली क्षण शेवाळ";
त्या स्पर्शात काय होतं,ते खरंच नाही कळत,
बेभान त्या विचारांनी, मन जातंय वेडावून पळत;
आता कळलं तू का रडतेस,तुला वाटतंय तू सर्वस्व गमावलंस,
नाही गं..उलट या घडल्या प्रसंगा करवी,तू मला आजन्म कमावलंस;
आज शपथ घेऊ,साक्ष देयील हि विशाल वडाची पसरीत छाया,
मिलनीत होऊ जेव्हा,"तो मखमली क्षण शेवाळच" राहील,आपला प्रणय पाया...!!
चारुदत्त अघोर.(२५/६/११)