पाऊस तुझा नि माझा

Started by nitinkumardeore, July 04, 2011, 11:06:22 PM

Previous topic - Next topic

nitinkumardeore

पाऊस तुझा नि माझा

पाऊस तुझ्या नि माझ्या प्रीतिचा ,
पाऊस तुझ्या नि माझ्या रितिचा,
पाऊस आठवून न संपना-या तुझ्या विचारांचा,
पाऊस तुझ्या अलगद स्पर्शाचा नि तुझ्या अत्तराच्या श्वासांचा ।
पाऊस ओसंडून वाहना-या धारांचा ,
पाऊस तुझ्यासवे वेचलेल्या गारांचा ,
पाऊस अनुभवलेल्या तुझ्या मधाळ हास्याचा ,
पाऊस तुझ्या नि फ़क्त तुझ्या ओल्याचिम्ब केसांचा ।
पाऊस झरोक्यातून नुसताच पहाण्याचा ,
पाऊस गरजना-या  ढगांचा नि चमकना-या विजांचा ,
पाऊस तुझ्यासवे मनसोक्त फिरण्याचा ,
पाऊस गरमागरम भजीसोबत चहापिण्याचा ।
प्रत्येक पाऊस तुझ्या विचारांचा पेटारा खुला करतो ,
प्रत्येक पाऊस तुझ्या सहवासासाठी झुरतो ,
प्रत्येक पावसात मी तुझ्यासवे असतो ,
नसलीस तू तर मी मात्र  एकटाच उरतो .
                                        - नितिनकुमार देवरे