खजिना.

Started by pralhad.dudhal, July 08, 2011, 05:46:40 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

खजिना.
कोण काय म्हणाले
नको करू चिंता मना.

मनासारखे जगावे
हीच ठेव कामना.

इच्छा आकांक्षा मनीच्या
दाबू नको रे अशा तू.

स्वच्छंदी जगून आनंदे
दे जीवना दिशा तू.

तुझा हात मिळाला
तुझा साथ मिळाला.

संसारात खुल्या सुखाचा
खजिना हातोहात मिळाला.
         प्रल्हाद दुधाळ.
    ........काही असे काही तसे!

gaurig

मस्तच....
तुझा हात मिळाला
तुझा साथ मिळाला ह्या ऐवजी

तुझा हात मिळाला
तुझी साथ मिळाली असे पाहिजे असे मला वाटते