त्या आठवणींना उजाळा..

Started by praffulbhorkar, July 09, 2011, 02:12:02 AM

Previous topic - Next topic

praffulbhorkar

निळाशार समुद्र, शांत होता वारा, ती पडकी भिंत, त्या आठवणींना उजाळा..

हीच ती जागा, अशीच ती वेळ, एकत्र होतो सारे, जगण्यातला खेळ..
किती ती मजा आणि किती ते वेड, मित्रांसोबत असताना, मन होते निर्भेड..
पूर्वीच्या रस्त्यांना होती मैत्रीची साथ, आता वाटही चुकली, गाठही तुटली, राहिली फक्त आस..

एकत्र फिरायचो, खूपदा भांडायचो, तोंडं वाकडी करूनसुद्धा, एकमेकांतच रमायचो..
स्वप्नं पहिली.. एकत्रपणे लढण्याची शपथ हि घेतली, स्वप्नं तशीच राहिली, "शपथ" मात्र हरवली..
आज पुन्हा यावेसे वाटले त्याच जागेवर, हरवलेली "शपथ" शोधायला, आणि राहिलेली स्वप्नं वेचायला..

डोळे भरले अश्रूंनी, मन झाले जड...
एकटेपणा होता फक्त सोबत माझ्या,
बाकी कोणालाच नव्हती सवड....

पाठ टेकवली भिंतीला,अलगद मिठी मारली स्वतःला, विचारांना दिली मोकळी वाट, नजरेचा होता भलताच थाट..
सावरून घेतले स्वतःला, सांभाळून घेतले मनाला, खळखळणाऱ्या  लाटांमध्ये, ओला झालता मैत्रीचा जिव्हाळा..

निळाशार समुद्र, शांत होता वारा, ती पडकी भिंत, त्या आठवणींना उजाळा.. त्या आठवणींना उजाळा..


-- प्रफुल्ल भोरकर


gaurig