गलितगात्र

Started by अमोल कांबळे, July 12, 2011, 06:25:29 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

तुला नाही म्हणताना  माझे डोळे भरून आले
मी काहीच बोललो नाही तुला सगळे कळून गेले
तू तुझ्या वाटेने, मी माझ्या निघालो
क्षण गलितगात्र , आभाळ भरून आले
पाउस येणार नक्की होतं, डोळ्यातला पाउस बरसला होता
भिजण्याची खंत कुणाला, सगळा क्षण भिजला होता
कडाडता विजा जणू  माझ्या हृदयाची साद होती
पाउसातून चालताना फक्त तुझी साथ होती
आता हात  रिकामा चेहऱ्यावरण फिरत होता
मनातले पावसाळे डोळ्या वरन पुसत होता
आता फक्त ओल्या खुणा मातीत अन मनात
नाते जन्म जन्माचे संपले एका क्षणात
                                            मैत्रेय (अमोल कांबळे)

gaurig

मस्तच....
कडाडता विजा जणू  माझ्या हृदयाची साद होती
पाउसातून चालताना फक्त तुझी साथ होती
आता हात  रिकामा चेहऱ्यावरण फिरत होता
मनातले पावसाळे डोळ्या वरन पुसत होता
आता फक्त ओल्या खुणा मातीत अन मनात
नाते जन्म जन्माचे संपले एका क्षणात
खुपच छान...

अमोल कांबळे

अनुभवाचे बोल ....

athang

आता फक्त ओल्या खुणा मातीत अन मनात
नाते जन्म जन्माचे संपले एका क्षणात

BEST !!!!

अमोल कांबळे