एक वेगळाच आनंद आहे.

Started by ankush.sonavane, July 13, 2011, 12:48:47 PM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

माझ्यापेक्षा तुझ्यात रमून जाने मला पसंद आहे
तुझ्या डोळ्यात रमून जाण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुला हसवण्यापेक्षा तुला रडवणे मला पसंद आहे
मिट्टीत घेवून तुला समजावण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुझ्या होकाराला नकार देणे मला पसंद आहे
तुला रागवलेली पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे.

माझ्यापेक्षा तुला सुखी ठेवणे मला पसंद आहे
तुझ्या सुखात आपले सुख समजण्यात एक वेगळाच आनंद आहे.

तुझ्यापेक्षा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहणे मला पसंद आहे
वाहणारे अश्रू थांबवण्यात एक वेगळाच आनंद आहे.
                                                     अंकुश सोनावणे

gaurig

एकदम झक्कास..... :)   एक वेगळाच आनंद आहे......