हे असे किती दिवस चालायचं.......

Started by ankush.sonavane, July 14, 2011, 11:40:42 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

असे जिवन किती दिवस जगत राहायचं
उघड्या डोळ्यांनी सगळे पाहत बसायचं
हे असे किती दिवस चालायचं......................... 

          त्यांनी मारत राहायचं आणि आपण मरायचं
      पकडलेत  ते तर त्यांना सुखात जगवायचं 
      हे असे किती दिवस चालायचं.........................

मुलांनी पोरके वाहायचं स्त्री ने कुंकू पुसायचं
सरकारने फक्त मदतीचं आश्वासन करायचं
हे असे किती दिवस चालायचं......................

       पोलिसांनी रस्ते अडवायचं  गरिबांना तपासायचं
     तरीही गुन्हेगारांनी मोकाठ फिरायचं
     हे असे किती दिवस चालायचं......................

वेळ आली आता सगळ्यांनी एकजूट होण्याची
खांद्याला खांधा लावून दहशतवादाशी लढण्याची.
हे असे किती दिवस चालायचं...................... 
                                       अंकुश सोनावणे

gaurig

kharach khupach chan......agadi vastav mandale aahe......

वेळ आली आता सगळ्यांनी एकजूट होण्याची
खांद्याला खांधा लावून दहशतवादाशी लढण्याची.
हे असे किती दिवस चालायचं...................... 
pan me tar manel
वेळ आली आता सगळ्यांनी एकजूट होण्याची
खांद्याला खांधा लावून आपल्या नालायक सरकारशी (politicians) लढण्याची.....