कविता

Started by अमोल कांबळे, July 14, 2011, 03:52:55 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

अनुभवलेल्या घटनांची बांधलेली माळ
म्हणजे कविता
सग्या सोयरयांची तुटलेली नाळ
म्हणजे कविता
माझ्या सारख्या स्वच्छंद पक्षाचं
मोकळं आभाळ  म्हणजे कविता
जीवापाड जपणाऱ्या आईचं
तान्हं बाळ म्हणजे कविता
क्षितिजा वरचा सूर्याचा थाट म्हणजे कविता
किनार्या वर घेऊन येणारी लाट म्हणजे कविता
माझ्या जगण्याची आस म्हणजे कविता
जगण्यास लागणारा श्वास म्हणजे कविता
ग्रीष्माच्या बरसलेल्या गारा म्हणजे कविता
कलेनं विणलेल्या  तारा म्हणजेच
क  वी  ता
                        मैत्रेय (अमोल कांबळे)