माझी कार

Started by केदार मेहेंदळे, July 14, 2011, 04:35:09 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे


पूर्वी ऑफिसला मी ट्रेन अन बसनी जायचो.

हवा खात डुलक्या काढत कधी पुस्तक वाचत,

आरामात दीड तासात ऑफिसला पोहचायचो.

महागाची  ट्रेन अन बस होती  माझ्या  दिमतीला,

कंडक्टरच्या  वेशात शोफर होता

अन होता ड्रायव्हरही माझ्या  दिमतीला.



ना पार्किंगची समस्या होती ना ट्राफिकच टेन्शन,

स्टेशनवर जिने चढायचच काय ते   एक्सर्शन.

संध्याकाळी बस सोडून चालतच  जायचो,

घरी मात्र रोज शार्प सातला पोहचायचो.

चालण्यामुळे माझ पोटही सपाट राहील होत,

एकूण महीन्याच  बजेट पचशेतच भागत होत.



ऑफिस मधले  कुलीग्स कार घेऊन यायचे.

घरापासून ऑफिसला एसी मधून पोहचायचे.

ट्रेन आणि बस टायरिंग वाटायला लागल.

स्वतःची कार  असल्याच  ड्रीम पडायला लागल.

कारवाले मित्र मागे लागलेच  होते

कारचे फायदे मला रोज समजावत होते.



मीपण मग एन्क़्वायरि सुरु केली.

वेगवेगळ्या शोरूम्सची वारी सुरु केली.

अखेर माझ्या बजेट मधली कार पसंद केली.

शोरूम वरच लोनची अप्लिकेशन भरली.

डाऊन पेमेंट करता एक एफडीही मोडली.

नेक्स्ट डे बिल्डींग मधे ब्रांड न्यू कार उभी केली.



आता मी ऑफिसला कारनी जायला लागलो,

विकेंडला औटींग, लाँग  ड्रेव  करायला लागलो.

हॉटेल अन मॉल मधेही कारनी जायला लागलो,

रस्त्यावरून चालणार्यांची कीव करायला लागलो.

भाजी सुध्धा आता कारनीच  आणायला लागलो,

ट्रेन अन बस हळूहळू विसरायला  लागलो.



पेस्लीप बघून माझ्या पोटात खड्डा पडला,

स्यालरीतून  जेव्हा ई.एम.आय. डीडक्ट  झाला.

पण मग विचार केला ठीकच आहे.......

स्टेटसची हि छोटीशी किमत आहे.

लोन तर काय आत्ता संपेल,

मग गाडी फुकटच तर आहे......



गाडी रोज धुवायला वॉचमनला  नेमल,

त्यानी महिना पाचशे वेतन सांगितल.

चार दिवसांनी सोसायटीच बिल आल,

त्यात पार्किंग चार्जेसच एडिशन   झाल.

महीन्याच बजेट जरा शुटपच झाल होत...

पण स्टेट्स साठी हे तर  आवश्यकच होत!



अलिबाग, महाबळेश्वरला ड्रायविंग झालच होत.

विकेंडला  ह्या मग पुण प्लान केल.

टोल दिला अन मस्त एकस्प्रेस्वेला लागलो.

एकशेवीसच्या स्पीडनी तासात पुण्याला पोहचलो.

दोन दिवस गाडीनी लोणावळा खंडाळा केल.

चिक्की देऊन मित्रान कडून कौतुक करून घेतल.



महिना अखेरीस बिल क्रेडीट कार्डच आल.

पेट्रोलचा खर्च बघून माझ धाब दणाणल.

विकेंडला कारनी फीरण भारी पडल होत.

कारपेक्षा बसनी फीरणच स्वस्त ठरल होत.

विकेंडला फीरण आता बंद करायचं ठरल.

ऑफिस साठीही आता कारपूल करायचं ठरवल.



कामा साठी बायको रीक्षेनी फिरत होती,

शाळे करता मुलीलाही रिक्षा मस्ट होती.

कार बरोबरच आता रिक्षेचा खर्च सुरु झाला,

मंथ एंड यायच्या आत बँक ब्याल्न्स नील झाला.

मनात मात्र आता मला कळून चुकल होत,

कार पेक्षा दोन टूविलर घेणच अफोर्डेब्ल होत.



ट्राफिक जाम मधे आडकण तर नित्याचच होत,

कार पेक्षा ट्रेननी जाणच जास्त क्न्विनियंत होत.

हळूहळू कार सर्विसिंग काढायला लागली,

महिना हजाराला फोडणी बसायला लागली.

कार मधे बसून बसून  ब्याकपेन  सुरु झाल,

खर्चाच्या टेन्शननि बिपी अन शुगर हि वाढल.



कारपूल तर कधीच बंद पडल होत.

विकेंडला कारनी फीरण  खर गरजेच न्हवत.

रोजरोज गाडी धुणहि फार खर्चाच होत.

पार्किंग चार्जेसच बर्डन मात्र कायम होत.

लोन खरतर आता संपलेलं होत....

पण गाडीच व्यलुएशन  हि डाऊन झाल होत.



कारनी ऑफिसला जाण आता टाळायला लागलो.

निमूट पूर्वी सारखा ट्रेननी जायला लागलो.

हवा खात डुलक्या काढत कधी पुस्तक वाचत,

आरामात दीड तासात ऑफिसला पोहचायला लागलो.

आता न पार्किंगची समस्या होती न ट्राफिकच  टेन्शन,

जिने चढायच्या एक्स्र्शंनी गेल शुगरचही  टेन्शन.



आता न मला बिपी ना शुगर राहिलंय.

क्रेडीट कार्डच्या बिलाचही टेन्शन संपलय.

पूर्वी सारखाच आता मी ऑफिसला निघतो,

महागाची बस अन ट्रेन सेवेला घेतो,

कंडक्टरच्या  वेशात शोफर हि असतो,

अन असतो ड्रायव्हरही मझ्या दिमतीला.



आजही माझी कार पार्किंग मध्ये उभी असते.

तिला रोज धुण्याची आता गरजच नसते.

मझ्या एका चुकीच्या निर्णयाची ती पुरावा असते.

म्हणूनच ती मला रोज बघायची असते.  



:-*kedar M

Pravin5000

chan kavita aahe.... pan thodi mothi jhali..... but doesn't matter..... nice......

MK ADMIN

Kavita mothi asli tari he Chan jamli ahe Kedar....

केदार मेहेंदळे