मी सुखरूप आहे....

Started by gojiree, July 14, 2011, 10:53:24 PM

Previous topic - Next topic

gojiree

आज सकाळी निघताना तू म्हणालीस,
"पोहोचल्यावर फोन कर रे , आणि सांग...
'मी सुखरूप आहे....' "

तेव्हा तुझी चेष्टा केली आणि म्हणालो,
"मी काय लहान आहे का आई...."
ऑफिसमध्ये पोहोचलो, चहाचे पैसे देताना
खिशात हात घातला तेव्हा आठवलं,
मोबाईल घरीच राहीला
आणि तुला सांगायचंच राहिलं,
'मी सुखरूप आहे....'

लंच टाईमच्या आधी टेबलवर प्रमोशनचं लेटर आलं
तुला ऑफिसमधून ही आनंदाची बातमी द्यायला फोन लावला
एवढ्यात मित्रांनी गराडा घातला
पार्टीचा धोसरा लावला
आणि तुला सांगायचंच राहिलं,
'मी सुखरूप आहे....'

संध्याकाळी परत येताना मिठाईचा पुडा घेतला
आणि माझ्याच विचारात चाललो होतो
तुला ही बातमी लवकर सांगायची होती
एवढ्यात बधीर करणारा एक आवाज कानावर आदळला
डोळ्यांपुढे अंधारी आली आणि कानावर पडल्या असंख्य किंकाळ्या
जीवाच्या आकांताने आक्रोश करणा-या अगतिक लोकांच्या
पण तुला सांगायचं होतं,
'मी सुखरूप आहे....'

जाणवत होत्या फ़क़्त वेदना
प्रत्येक सेकंदाला वाढत जाणा-या
आणि आठवत होते तुझे पाणीदार डोळे
मी जाताना माझ्याकडे बघत राहणारे
शेवटचा श्वास तुटत होता पण तुला सांगायचं होतं,
'आई......
मी सुखरूप आहे....'

-गोजिरी



अमोल कांबळे

Atishay, hridaysparshi.  nw one of my fav.

gojiree

kharokhar, dolyat pani aalyashivay rahat nahi.....
wachtana ani lhitana suddha!!