माझा एकटेपणा..

Started by jayashri321, July 17, 2011, 02:42:21 PM

Previous topic - Next topic

jayashri321

जेव्हा कधीतरी कुठेतरी..

एकटं असल्याची जाणीव व्हायला लागते..

अन् माझी मी एकटी ,एकटीच उरते..

माझ्या ह्र्दयात..

तेव्हा....

तुफान वारे आदळत राहतात दारा-खिड्क्यांवर,

त्यांचे ओरखडे उमटवत..

आकाशातून विजा कोसळतात जमिनीवर माझ्या मनाच्या...

जाळून जाळून टाकतात अंतरंग माझे..

डागण्या देत राहतात..

आतल्या आत..

माझ्या जखमा वाहत राहतात..

कधीतरी भरलेल्या,

अन् आता उकरलेल्या ज्या..

मुसळधार पाऊस बरसतच राहतो..

डॉक्यावरलं छत टपटपू लागेपर्यंत..

अन् दुखाचे कढ झिरपत राहतात मग नसानसांमधून..

श्वासांतून मग झंकारत राहतो..,

तो आर्त आवाजाचा वीणा,

तारा छेडायला जाताच हात रक्ताळणारा..

नाव बेभरवशाची...

त्या खवळलेल्या सागरात सोड्लेली..

भटकत राहते दिशाहीन..

अनंत कालापर्यंत,

पण किनारा काही सापडत नाही..

चराचर व्यापून टाकतात हे काळे मेघ..

सावल्यांत वेढून जाते मी..

एकटेपणाच्या गर्तेत..

माझ्याच सावल्यांसमवेत..,

स्वतालाच धुंडाळत बसते..

सूर्य उगवेपर्यंत..

chetant087


jayashri321


chetant087

#3
वाचल्यावर reply  देणं :) :D (just kidding )

- nice poem  (nice expression of difficult / complicated feelings :) )

jayashri321

oye.. to 1st wala smiley aahe na( ???) to chukun aalay..
complicated goshtisathi complicated expression dile tr goshti aankhi complicated honar na..
mhnun..
he he he.. :)