जगायचं ठरवलयं मी...

Started by jayashri321, July 18, 2011, 09:58:01 PM

Previous topic - Next topic

jayashri321

अंतरात आज माझ्या..
हाक तीच ऐकतो आहे,
अंधार दूर होत नाही..
वाट उष:कालाची मी पाहतो आहे..

साद वेदनेची आर्त..
शरीराची अन् मनाचीही,
जखमा भरुन येत नाही..
आहे सुखाची भ्रांत..

मॄगजळासाठी तरसलो मी..
राहीलो तॄषार्थ,
छेड्लेल्या सुरांमध्ये मी..
माझेच शोधतो अर्थ..

हिरवळही बोचरी झाली..
वाट कुठे संपत नाही,
नजर जाते जिथवर..
प्रवासाशिवाय काही दिसत नाही..

निरर्थकच जगणे माझे आता..
कुठवर ओढत न्यावे,
नियतीने खेळ केला..
जग माझे माझेच नसावे???

ऐकण्यास साद माझी..
जवळ कुणी नाही,
कोलमडलेल्या मनास माझ्या सावरण्या ..
बाहू कुणाचे नाही..

उरलो एकटा जरी..
आशा उरीची एकच,
जगेण मी आयुष्य पुन्हा,
नवीन लिहेन कहाणी आता..
नवं कोरं निळं पुस्तक आभाळाचं..
सजवेन स्वप्नांनी पुन्हा..

जखमा जरी बांधू न शकलो..
धैर्य मात्र एकवटेन..
पाय जरी रक्तबंबाळ माझे..
आत्मविश्वासाचं बळं आहे..
नवीन प्रवाहात झोकून देईन स्वतःला..
मार्ग मी हा चालू शकेन..

पंख छाट्ले जरी माझे..
आकांक्षा माझ्या मात्र अवकाशी ..
झेप घेण्या उत्सुक..

ठरवलयं ..
जगायचं आता..
भरभरुन...

वेदनांचे बंध तोडून..
मुक्त व्हायचं..
असला अखंड प्रवास जरी..
नसली वाटेवर सावली जरी..
वाटसरु मी..
चालतच राहीन..

जगायचं ठरवलयं मी...


केदार मेहेंदळे




jayashri321


vidyakavita



SUDHIR CHALGANJE