कविता काही अशीच होत नाही...

Started by vijay_dilwale, July 19, 2011, 02:06:20 PM

Previous topic - Next topic

vijay_dilwale


मन जड होतं...बोल अपुरे पडतात..
भावना व्यक्त करायला चेहऱ्याचे स्नायू कमी भासतात..

अशक्य होतं हसन..अन रडनही...
तेव्हाच कविता लिहायला हात सळसळ करतात...




असूनही आपलं कुणी...आपलं कधीच होत नाही...
अन परक्याच्या मायेची परतफेड करायला सात जन्म पुरत नाहीत...
साधताच येत नाही कधी कधी ध्येय आयुष्यातलं...
बाण सुटतात अनेक धनुष्यातून...लक्ष्यावर मात्र एकही लागत नाही...
काय झालंय...आणि इथून पुढे काय करायचंय काहीच कळत नाही..
अन अशाच वेळी कागद अन पेन हातात कधी येतो..काहीच उमगत नाही...




कविता काही अशीच होत नाही...
विचारांचा वणवा नुसताच भडकतो...त्याला कधी पेटताच येत नाही..
थेंब नुसते डोळ्यात साठतात...पण गालावर कधी ओघळंतच नाहीत...
पहावी लागतात स्वप्नं पूर्ण होता होताच उध्वस्त होताना...
रडायला सुद्धा आधार लागतो पावसाचा...
हसावं लागतं कुणाला शेवटचा अलविदा करताना...




अशीच होते कविता...जेव्हा...
डोळे अर्धे पाणावलेले असतात..
हात थरथर कापतात...
डोक्याची विचारचक्रे एका जागी येऊन थांबतात...
अन रात्रीच्या एकांतात अलगद पापण्या मिटतात...

amoul