“तूच माझी शेम्पेन”....!©चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, July 21, 2011, 11:08:16 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"तूच माझी शेम्पेन"....!©चारुदत्त अघोर.(३/५/११)
एकदा लग्न आधी,मला तू विचारलेलं, तू ड्रिंक्स घेतो?
त्यावर मी उत्तर्लेलो कि,श्रावणातही पाऊस कधी कधीच येतो;
तू गोंधळून चिडून म्हणालीस,हे कसलं उत्तर,
मी म्हटलेलं,तू न विचारलेलंच बेहेतर;
तरी तू त्याच प्रश्नाला हाताळत म्हणालीस, मला खरं सांग,
मी म्हंटलं,चार थेंब काढलेत तरी सागर राहतो अथांग;
माझ्या छातीवर बुक्क्या मारीत तू,त्रागावालीस,
माझे केस ओढत,माझ्यावर रागावलीस;
तेव्हा मी म्हंटलं,अगं वेडा बाई,जर तू नसलीस माझ्या कधी निअर,
तेव्हा सिन्सिअरली हवी,तुझ्या सरीला पुरती चिल्ड बिअर; 
तू म्हणालीस ,म्हणजे तू पितो?,
मी म्हंटलं,अगं नाही,तुझ्या अभावी तिच्यातून श्वास घेतो,
तू म्हणालीस म्हणजे काय?एरवी काय श्वासत नाही?
मी उत्तरलो कि तू असता,ते कधीच भासत नाही,
तू म्हणालीस आता प्रॉमिस कर,मी आली तर घेणारच नाही.,
मी म्हंटलं खात्रीने, अशी वेळच कधी येणारच नाही;
तू म्हणालीस ते कसं?
मी उत्तरलो,... ऐक ते असं...........
..................!!!
आता,तू झालीस माझी निअर एण्ड डीअर,
तुझ्यातच आता माझी,चिल्ड बिअर,
तुझ्या पाउलीच बसतो,माझा सौन्सारी जम,
तुझ्या चालीतच माझी, ओल्ड मोंक रम;
तू असली कि कोणताही प्रसंग,नाही वाटत रिस्की,
तुझी साथच माझी जशी,रॉ स्कॉच व्हिस्की;
आपला सौन्सारच जसा एक,लाईफ-लाँग जॉय राईड,
तूच माझी फोरएव्हर ,ब्लेंडर्स प्राईड;
तुझ्या स्व-शैलीतच एक मॉडेल, जे अफलातून ट्रेंडी,
माझ्या नसा-नसात, तू पसरलेली हॉट ब्रेन्डी; 
कारण तुझ्या जवळ असतो,प्रत्येक गोष्टीचा तोडगा,
तुझ्या स्पर्शातच माझा, नशीला वोडका;
जरी का तू स्वतः घेतेस, कधी फ्रुट मोक्टेल;
पण मझ्या करता तू, या सर्व पेयाचं कॉकटेल;
याहून अधिक काय करू,माझ्या लाईफचं केम्पेन,
तुझ्या दाट पापणीतली नजरच, माझी बुच उडून फवारलेली शेम्पेन....!
चिअर्स...!!! 
चारुदत्त अघोर.©(३/५/११)

santoshi.world