एक वाट..

Started by jayashri321, July 22, 2011, 12:52:49 AM

Previous topic - Next topic

jayashri321

एक वाट एकाकी..
एकांती एकटीची..
लाखोंच्या जगातही अनोळखी ,

एक वाट..

भिजलेल्या डोळ्यांची
वाहणार्‍या झर्‍यांची..
कोरड्या पापण्यांची
आटून गेलेल्या प्रवाहांची..

एक वाट..

हिरवाईची,गर्द दाट रानांची..
पालापाचोळ्याची,चोळामोळा झालेल्या पाकळ्यांची..
निवडूंगाची..

एक वाट..

स्वप्नील मनाची,
भरारी घेणार्‍या आकांक्षांची..
आकाशावर राज्य करणार्‍या कर्तूत्त्वाची..
पंख छाटलेल्या पक्ष्याची..
भंगलेल्या स्वप्नांची..
जमिनदोस्त झालेल्या आशांची..

एक वाट..

वाढत जाणार्‍या ह्रुदयाच्या ठोक्यांतली..
अडखळणार्‍या शब्दांची..
अडकून पडणार्‍या नजरेची..
ओठांवरल्या गाण्यांची..
नि:श्वास अन् उसास्यांची..
ओल्या अश्रुंची..
ढळतणार्‍या विश्वासाची,
काटेरी बाभळीची..

एक वाट

उबदार शालीची..
सुखद आश्वासनांची,
सोबत चालत राहायच असं ठरवलेली..

एक वाट

कडाडणार्‍या वीजेची..
होरपळणार्‍या ज्वाळांची..
जड पावलांची..
मिटल्या पापण्यांची..
कोरड्या डोळ्यांची..

एक वाट

एक वाट..
या सगळ्यांतून सुटका करणारी..
शेवटचीच..
निर्वाणाकडे नेणारी...


अमोल कांबळे

हि वाट दूर जाते...........खरंच अप्रतिम !

jayashri321