गर्व

Started by ankush.sonavane, July 22, 2011, 11:23:46 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

तिच्या सुंदरपणामुळे  ती त्याला सोडून जाते
जगणे कठीण होते म्हणून ती त्याचाकडे  परत येते.

         तिरस्कार वाटतो नदीला समुद्राचा पण समुद्रालाच  मिळते
        दुख सगळे विसरून त्याच्या खुशीत मिसळून जाते.

जुन्या आठवणीना उजाळा देत ते रडू लागतात
वाहणाऱ्या अश्रूंच्या मग लाटा बनून उसळू लागतात.

          अश्रू फक्त पाझरत राहतात त्याला कोणी साठवत नाही
         त्यामुळेच  कदाचित समुद्राचे पाणी कोणी पीत नाही.

सुंदरता हरून जाते मग विजय होतो  सत्याचा
गर्वामुळे अर्थ कळत नाही ख-या  प्रेमाचा.
                                        अंकुश सोनावणे

केदार मेहेंदळे


mahesh4812


nikita


sindu.sonwane