उत्तर हवंय मला!

Started by अमोल कांबळे, July 22, 2011, 01:41:23 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

उत्तर  हवंय  मला , कुठे  होतीस  तू ,
मी  एकटाच  पाखरासारखा  भिरभिरणारा ,
आपल्याच  घराची  वाट  चुकणारा  ,
कुणी  दिसतंय  का ? मला  रस्ता दाखवणारं ,
भरल्या  डोळ्यांनी  तुला  शोधणारा .
कुठे  होतीस  तू .
माझे   असा  काय  चुकलं  होतं ,
मी  तुझ्यावर  प्रेम  केलं  होतं ,
कदर  माझ्या   प्रेमाची  झालीच  नाही .
तुला  माझी  आठवण  कधी   आलीच  नाही .
उत्तर  हवंय  मला , कुठे  होतीस  तू .
मला  माफ  कर  एवढंच  बोललीस ,
परत  कधी  न  भेटण्याची  विनवणी  केलीस ,
जाता  जाता  आयुष्यातून , रंगच  काढून  गेलीस ,
बेरंग  जगलो .
म्हणूनच  उत्तर  हवंय  मला , कुठे  होतीस  तू ?
काळाने  जखमांची  भरणी   केली ,
रडून  रडून  पापणी  सुकून  गेली .
तेव्हा  उमगले  चूक  करतोय ,
मी  कुणासाठी  मरतोय ,
परत  पंख  सावरले , आकाशात  उडण्यासाठी ,
म्हणूनच  उत्तर  हवंय  मला , कुठे  होतीस  तू ?
आता  कुठे  सावरलो  होतो ,
उंच  भराऱ्या  घेत  होतो .
न  कसली  चिंता  , नको  आधार  कुणाचा .
आता  मी  आनंदी  होतो .
नियतीला  का  मान्य  नाही ,
का  असा   खेळ  खेळते ,
सर्वे  काही  सुरळीत  असताना ,
परत  तुझी  चाहूल  येते ,
मी  आलेय ,मला  स्वीकार ,
मला  परत  तुझे  व्हायचं ,
झाल्या  चुका  माफ  कर .
आता   फक्त  तुझ्यासोबत  जगायचं .
म्हणूनच , उत्तर  हवंय  मला , कुठे  होतीस  तू .?
परत  प्रश्नांचा  भडीमार ! उत्तरांची  कमतरता !
परत  माझ्या  जगण्यात , परत  आली  अस्वथता !
आता  फक्त  एकंच  प्रश्न  तुला  विचारायचं !
कुठे  होतीस  तू ? आहे  का  उत्तर ?
उत्तर  हवंय .
माझ्या  आठवणींच ,
तुझी  वेडी  वाट  पाहण्याचं ,
उत्तर  हवंय ,
माझ्या बेरंग  जगण्याच ,
एकटं  फिरण्याचं ,
कधी  न विसरणार्या , त्या  अमोल  क्षणाचं !
                                                      मैत्रेय (अमोल कांबळे)

jayashri321

परत  प्रश्नांचा  भडीमार ! उत्तरांची  कमतरता !
परत  माझ्या  जगण्यात , परत  आली  अस्वथता !
आता  फक्त  एकंच  प्रश्न  तुला  विचारायचं !
कुठे  होतीस  तू ? आहे  का  उत्तर ?
उत्तर  हवंय .
माझ्या  आठवणींच ,
तुझी  वेडी  वाट  पाहण्याचं ,
उत्तर  हवंय ,
माझ्या बेरंग  जगण्याच ,
एकटं  फिरण्याचं ,
कधी  न विसरणार्या , त्या  अमोल  क्षणाचं !




chaan ahe....
punha paratnyasathi kuni jauch naye aayushyaatun..
virahatle dukhh sahan kelyanantr...tya wyktishiway jagnyachi sawy zalyanantr..
punha kashala santh layit chalalelya aayushyaat khalbal maajwaychi...

अमोल कांबळे

आयुष्य हे असंच आहे. वेळ गेली तरी काही क्षण परत फिरून येतात, काही आनंद तर काही दु:ख देऊन जातात 

jayashri321

mag te kshan punha aaplya ayushyat aalyanantr kay karaych???
punha saglya aathwani ekwtun..dukkh wisrun tyach prawahat aankhi ekda udi ghyaychi ki jya prawahat aahot tyasobatch pudhe jaych??

mahesh4812

asha lokanna, ki jyanna aplyavar prem karnarya manasachi kimmat kalat nahi, tyanna punha ayushyat na swikarlelech changle ahe.

jayashri321

@mahesh ..
barobar boltoys re..
asch karayla haw..pan as kartana khup wedna hotat.. :(

अमोल कांबळे

@महेश
अगदी बरोबर आहे. अशा लोकांना न स्वीकारलेलचं चांगलं