प्रवासात सगळेच अनोळखी असतात.....

Started by gaurig, July 24, 2011, 10:53:20 AM

Previous topic - Next topic

gaurig

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

.........जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलं कोमेजतात....
Unknown

PRASAD NADKARNI


gaurig