लेक माझी लाडकी

Started by बाळासाहेब तानवडे, July 25, 2011, 11:21:47 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे



लेक माझी लाडकी

लेक माझी लाडकी , भाग्य घेऊन आली.
सुख-दु:खाच्या क्षणात,साथ मला देत गेली.

आई वर जीव भारी,सर्वांची तू मोठी ताई.
काही अडता-नडता , तुज कडे धाव जाई.

तुज नसे कधीही,आळस कोण्या कामाचा.
हसत मुख सदा राही , ठाव नसे घामाचा.

आकाशी या स्थित होते,चंद्र,सूर्य अन् तारे.
पण मला न कळले , कसे फिरले ते वारे.

शब्दा मागून शब्द आले, वाढले दो मुखात.
परिणीती मग झाली, अबोला अन् दु:खात.

धन-दौलत , जमीन-जुमला, ना राही माझा-तुझा.
चार दिसांच्या जीवनी या,का ही अबोलाची  सजा?

अखेरचे दिन आता, बघ माझे हे आले.
यमराज काल मला,आमंत्रण देऊन गेले.

आता एकवार तरी, जावस भेट तू देऊन.
राग ,द्वेष ,अभिमान, थोड बाजूस ठेऊन.

यमराजा थोपविले, दिली हजार कारणे.
आता तरी भेट मला,सोड तुझे ते धरणे.

वाट पाहणेची आता , लेकी पार झाली हद्द.
नेण्या स्वर्गाच्या दिशेने,चंद्रगुप्त  आले खुद्द.

आता पर्वा ना जनांची, तोंड देईन निंदेस.
पण रोकेन शिवण्या, तो पिंड कावळ्यास.


कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २५/०७/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/