अशी पाखरे उडून जातात....

Started by ankush.sonavane, July 26, 2011, 10:05:32 AM

Previous topic - Next topic

ankush.sonavane

     
अशी पाखरे उडून जातात जिवनाच्या फांदीवरूनी
देवून दुसऱ्यांना दुख स्वतः जातात विसरुनी.

     येवून दोन दिवस राहतात हृदयात घर करुनी
     एकाकी निघून जातात हृदय  हे  चिरुनी.

राहतात स्वतः जिवन आनंदात जगूनी
विसरता न येणारे दुख जातात फांदीला देवूनी.

    मिटणार नाहीत आसे जातात घाव देवूनी
    प्रत्येक क्षणाला डोळे येतात भरुनी.

कसं जमत असेल एकाकी त्यांना जाने विसरुनी
येत असेल का आठवणीत त्यांचे डोळे पाण्यानी भरुनी.
                                                           अंकुश सोनावणे