तुझी माझी पहिली भेट!

Started by अमोल कांबळे, July 26, 2011, 04:39:11 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

तुझी माझी पहिली  भेट , ठरलेली  नव्हती ,
गाडी  तुझी  माझी  रुळावरच  नव्हती .
काय  नेम  नव्हता , कुठे  भेटणार .
काय कळत नव्हतं  तुला   कसं  सांगणार .
दुपार  झाली . उन  वाढलं.
तुझ्या  माझ्यातलं  अंतर  बरच वाढलं .
कधी  दुपार  टळेल , आपली  भेट  होईल .
काय  व्हायचं  ते  होईल  थेट  होईल ,
संध्याकाळ  होताच , तू   पाणी  भरण्यास  निघाली .
आमची  स्वारी  मग  पाण्याकडेच निघाली .
कधी  सांगेन  मनातलं असं  वाटत  होतं.
जवळ  जाता  जाता  नाही  म्हणत  होतं .
तू  काय  म्हणशील  अंदाज  घेत  होतं .
आमचं  घोडं   पाण्यालाच  घाबरत  होतं .
जवळपास  कुणी  नाही . हीच  वेळ  होती .
तू  निघणार   तुझी  घागर  भरली  होती .
तू  निघालीस . मी  वेडा  झालो .
स्वतालाच  काय तरी  बोलू  लागलो .
तुला  जाणवत  होतं  माझं  वागणं  .
असं  तुझ्याकडं वेड्यासारखं  बघणं.
तू  वळलीस  अचानक , म्हणालीस .
काय  बोलायचं  का ?
मी  दचकलो ,
मनाला  विचारलं  उत्तर  देऊ  का ?
मन  म्हणालं  बोलून  टाक ,
राज  मनातले  खोलून  टाक ,
हिम्मत  केली . बोलून  टाकले .
परत  येणार  काय ? ...पाण्याला ...
ती  हसली .. म्हणाली ..
माझं   पाणी  भरून  कधीच  झालाय ..
मी  आलेय  तुला  भेटायला ..
मी  अवाक! शब्दच  सुचेना .
जे  मी  बोलायचं  हिच  बोलली .
अन  आमची  तर  बोबडीच  वळली .
जमवून  हिम्मत  परत  एकदा ,
प्रश्न  तिला  केला ...माझं  तुझ्यावर  प्रेम  आहे ..
ती  हसली ..अन  म्हणाली .
आता  मी  रोजच  पाणी  भरायला  येणार  आहे ........कळलं  का?
                                                                               मैत्रेय (अमोल कांबळे)





Yogesh143

Khoop chhan watali kawita
Good sense of humour in ending


Pravin5000