लाडक्या चोरांसाठी!

Started by अमोल कांबळे, July 27, 2011, 01:36:43 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

आजकाल एक व्यसन वाढलंय,
दुसऱ्यांचं आपलं म्हणण्याचं,
एकाधी गोष्ट चांगली दिसली,
हळूच चोरण्याच.
आपली कविता दुसर्याने कॉपी करावी,
आपण मात्र  बघत बसावं
भावना आपल्या, शब्द आपले
नाव मात्र दुसर्याने कमवावं
आपण चोरी करत आहोत अस वाटत नाही का?
कॉपी करताना लाज वाटत नाही का?
स्वतः लाच  फसवताय तुम्ही,
कवीच्या भावनांशी खेळताय तुम्ही,
चोरट्यांना भावनांची किंमत कळत नाही
भावना दुकानात विकत मिळत नाहीत.
विसरलोच! चोर म्हटला कि भावना कसल्या ?
एक सांगू चोरानो!
खऱ्या भावनांची चोरीच करता येत नाही!!!
                                                                 मैत्रेय (अमोल कांबळे)