मी आणि गर्दी

Started by शशि, July 27, 2011, 11:27:34 PM

Previous topic - Next topic

शशि

सध्या घरात एकटाच आहे  , गॅलरीत  उभा राहून बघत होतो समोरच्या जगात .
कुठतरी वाचलं होतं , " माणूस एकटा असला कि हरवतो , गर्दीत हरवालायला होतं नाही ".

खरंय का ते ?

पण कधी कधी असं वाटतं आपण स्वतःलाच हरवून घेत असतो या गर्दीत !

गर्दी ऽऽ ...  कसली ?

माणसांची , गाड्यांची
विचारांची , आचाराची
competition ची , career ची
गरजांची , पैश्याची ,
अपेक्षांची , स्वप्नांची
दारिद्र्याची , श्रीमंतीची ,
मुला बाळांची , संसाराची ,

गर्दी...... गर्दी...  गर्दी ........

अरे काय ही गर्दी  ??????

खरच आपण स्वतःलाच हरवून बसलोय का या गर्दीत  ?  आज एकटा राहायला वेळ कुणाला आहे ?.. कुठल्या न कुठल्यातरी  form मध्ये ही गर्दी आहेच , आपल्या भोवती ......

...या विचाराने मीही भटकलो  , आता एकटा असूनही मी देखील कुठेतरी हरवलोय  असं वाटायला लागलं होतं ........

आज ऑफिसला जायचंय - कामं संपवायचीत ,
संध्याकाळी Big Bazar आणि  लक्ष्मी रोड,
सोमवार पासून पुन्हा  Regular Routine - मोजकीच झोप , मरमर काम
पुढल्या मार्च मध्ये Appraisal  ,पगार तर वाढायलाच हवा, गरजा वाढल्यात.....जबाबदारी वाढलीय ...
Home Loan , गाडीचे हप्ते , Personal Loan....
Financial Planning , Retirement Planning, .....महागाई , मुलांचं Education.....
बायको , मित्र , संसार , परिवार , आई -वडील , भावंड ...

गर्दी आहेच , मी एकटा कुठेय .........?

माणूस एकटा जन्माला येतो , पण मरताना गर्दीतच ....
किंबहुना या सगळ्या गर्दीत तो कधीच मेलेला असतो ......स्वतःसाठी !   तो जगतोय नान्हा तर्हेच्या  गर्दी साठीच ........जन्माबरोबर  मिळालेला देह घेउन ...

या गर्दीची खरंच गरज  आहे ???   एकटं नाही जगू  शकत आपण  गर्दीशिवाय ???

बहुतेक नाही......

माकडं आणि वाघ .
माकडं माणसाळली , त्यांनी गर्दीशी जवळीक केली ..... त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला ......
पण वाघ जंगलातच , गर्दी पासून दूर .  आता उरलेत बोटांवर मोजण्या इतके ....

बहितेक निसर्ग नियमच असावा हा .. गर्दीतच राहा ......ज्याने पाळला तो तग धरून आहे .

झुंड , थवा , कळप, समुदाय  ....जे ह्यात मिसळले , ते जगत आहेत.

मी जेव्हा पुस्तकांच्या गर्दीत होतो  , तेव्हा वाचलं होतं  " Survival of the fittest ". Darwin म्हणतो   " Survival of the fittest  is  a metaphor for " better adapted for immediate, local environment ".
ज्याने बदल accept केला , अनुभवला , आपलासा केला आणि बदलला .....तो वाचला .

आता विचारांची गर्दी झाली होती डोक्यात ..  गर्दी आपल्या साठी , कि आपण गर्दी साठी ........

इतक्यात Phone वाझला ............

तिकडून बायको :
         काय करतोयस ?. अजून बिछाण्यावरच , ११ वाजून गेलेत , ऑफिसला जायचं नाही का ?
         आवर , बरीच कामं आहेत तुला आज ...
         पुढल्या Weekend ला येताना बरंचस समान आणायचंय  . बाळाची अन माझी औषध , बाळाचे कपडे , स्वेटर..
         तू लेलेंना फोन केलास ?.. कालच म्हणाली होती फोन कर म्हणून ...
         तुझी कामं म्हणजे ना ?...
मी :
        अगं हो .....

मी स्वतःलाच :
        हो आलोच ' Return ' पुन्हा त्या गर्दीत ..
        कामा साठी , ऑफिससाठी , तुझ्या साठी , बाळासाठी , Survival साठी , उद्याच्या स्वप्नपूर्तीसाठी . पुन्हा एकट्यात न जाण्यासाठी  .......
        आलोच .ऽऽ........

sanjiv_n007

Kharkhar maanus ya vichranchya GARDIT harvato.

PRASAD NADKARNI


शशि