या कवितेला नावच नाही..

Started by jayashri321, July 29, 2011, 10:11:09 AM

Previous topic - Next topic

jayashri321

शेवटी रस्त्यात गाठलच त्याने मला,
म्हणाला..
'दो दिन से कुछ खाया नही..'
मी त्याच्याकडे अन् त्याच्या कडेवरल्या ..
त्या भुकेल्या,निरागस चेहर्‍याकडे पाहिलं,
अन् त्याला खायला दिल..
थोड्या वेळाने पुन्हा तोच!!!
समोर दत्त म्हणून हजर!
रागच आला मला..
वाटलं,
शेवटी सगळे म्हणतात तेच खरं..
यांची हाव कधी संपणारच नाही,
त्याला तसच कटवलं मी..
असच रस्त्याने चालत जात असता,,
तो दिसला मला..
पाहून त्याला या वेळेस..
संताप नाही आला..
डोळ्यांच्या कडा ओलावल्या,
रस्त्याच्या कडेलाच संसार मांडला होता,
विनाछप्पराचा..
त्याच्यासोबत तोच चिमुकला..
अन् एक आई ,
अंथरुणाला खिळलेली..
भरवत होता तो त्याच्या आईला,
तिच्या राठ झालेल्या केसांमधून मायेने हात फिरवत..
पाहिल्यावर ते दृश्य..
कीव आली आपल्या जगण्याची..
आईच्या केसांतून हात फिरवण सोडाच..
आपण इतक पळतोय आयुष्यासोबत,
आपल्याला चालायला शिकवलं..
त्या हाताला हातात घेउन पुढे जाता येत नाही आप्ल्याला..
अडगळं म्हणून आपल्याच माता-पिता ला..
दूर करणारे आपण..
सगळं माझ माझं म्हणता म्हणता ..
जगणं संपवणारे आपण,
स्वतःकडे आहे त्यात समाधान नाही,
म्हणून दुसर्‍याकडलं हिसकावून घेणारे आपण..
दुसर्‍याचं दुखः तरी कसं वाटणार??
आपल्यातल्या घास दुसर्‍याला कसा भरवणार???