“उशीर होतो...!!” ©चारुदत्त अघोर.

Started by charudutta_090, July 30, 2011, 12:45:08 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"उशीर होतो...!!" ©चारुदत्त अघोर.(३/७/११)
आपल्या लग्ना आधी आणि नंतर,तुझा एकच प्रोब्लेम असायचा,
मी थोडही उशिरानं आलो कि,तुझा मुडच जायचा,
आणि मला यायला, नेमकी उशीरच व्हायचा,
कारण ऑफिस मधल्या कामात, वेळ निसटायचा;
पण तेव्हा एक मोगर्याचा गजरा, येताना मी घ्यायचो,
तुला भेटल्या वर तुझ्या, दाट केशी माळायचो;
तो मोगर्याचा वासच तुला, त्या रागातून मुक्त करायचा,
आणि माझ्या सर्व रसना,मला ओथंबून लुटू द्यायचा;
तू म्हणायची,एक हा मोगरा आहे जो मला रागातून पिघळून टाकतो,
आणि एक तू ,जो वेडावून माझ्या पाशी, विळखून वाकतो;
मी म्हंटलं होतं,हे वाक्य सदैव आचर्णीत ठेव,नको कधी विसरू,
किती काळ गेला तरी,माझे बाहू तुला,जवळायला असतील पसरू;
पण कालातराने तू हे सगळं विसरलीस,
उंच प्रणयी शिखरा वरून,सरळ सौन्सारी घसरलीस;
असाच त्या दिवशी,मला उशीर झाला,म्हणून तू ठरवून,अबोली झालीस,
माझ्याशी नाहीच बोलायचे,या निर्णयी,न बोलता झोपून गेलीस;
मी हि तुझ्याच बाजूला,कडी झोपलो,जरी तू पाठ कडी अडलीस,
मी झोपेत असता,माझ्या आवळल्या मुठीतला मोगरा बघून हुंदाक्वून रडलीस;
मला लागलीच जवळ घेऊन,म्हणालीस, खरंच रे सोन्या मी चुकले,
का तुझ्यावर रागावून,या वेळेपर्यंतचे सुवासिक,दवीत क्षण मी मुकले;
माझ्या ओठी सहज निघाले,हा मोगराच सर्व काही जुळवून जातो,
तुला नेहेमीच समजण्यात आणि मला येण्यात,जरी उशीर होतो...!!
चारुदत्त अघोर.(३/७/११)