nice collection here

Started by marathi, January 24, 2009, 11:25:09 AM

Previous topic - Next topic

marathi

मी पाहिलय तुला
मला सोडुन् जाताना....
स्वत:च्या डोल्यातुन
तुला वाह्ताना.....
- मनोज चौधरी

स्वतःच्या परिनं जिवन जगण्याची
इथे प्रत्येकास संधी नसते
प्रत्येक झाडाच्या नियती
हिरवीगार फांदी नसते

नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे

- सनिल पांगे

पापाचा घडा भरला आहे पण,
निर्वाणीचा दूर आहे तो क्षण,
देवंही आता गप्प बसलाय,
नऊ अवतारां नंतर धास्तावलाय !!!!



समाजाला काही,
स्त्री पुरूष समानता रुजली नाही,
रामाच्याही सीतेला
अग्नी परीक्षा चुकली नाही!!!!



बुडल्यावर दुःखात,
माणसांची पाठ फिरली.
माणूसच काय .... पण अंधारात
सावलीनेही साथ सोडली.
- शैलेन्द्र बार्शीकर


माणूस

देवाला देवत्व देतो
त्याचे विसर्जनहि करतो
एवढा महान माणूस
कधीकधी आत्महत्याहि करतो

- अनिलकुमार


भावना अन् वस्तुस्थिती
यात छोटी गफलत असते,
मनाच्या प्रांगणात
भावनाच वस्तुस्थिति असते.
- राहूल.



हरलेला डाव ऱागाने पुन्हा मांडू नये
खेळण्यांनी खेळण्यांशी हें असें भांडू नये
सोसतांना ती कशी तृप्तीत सोसावी व्यथा
आसवांची बात न्यारी, पण स्व:ता सांडू नये

vikas8910

meaning Please....

हरलेला डाव ऱागाने पुन्हा मांडू नये
खेळण्यांनी खेळण्यांशी हें असें भांडू नये
सोसतांना ती कशी तृप्तीत सोसावी व्यथा
आसवांची बात न्यारी, पण स्व:ता सांडू नये