संत सेना महाराज-अलौकिक प्रसंग-

Started by Atul Kaviraje, June 18, 2025, 10:08:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          "संत चरित्र"
                         ------------

          संत सेना महाराज-

      अलौकिक प्रसंग-

सेनाजीच्या तरुण वयानुसार देविदासांनी सेनाजींचा विवाह करून दिला. पत्नीचे नाव सुंदरबाई, पत्नी सुस्वभावी, आज्ञाधारक, वृद्धत्वामुळे देविदासांनी आपला व्यवसाय मुलाकडे सुपूर्त केला. राजदरबारातील वृत्ती मुलाकडे लावून दिली आणि हरिभजनात आपला काळ ते घालवू लागले. महाराष्ट्रात पंढरपूरला विठ्ठल

दर्शनासाठी जावयाचे ठरले, पण प्रकृती साथ देत नव्हती. शेवटी सेनाजीना वडिलांनी जवळ बोलावून सांगितले. "दक्षिणेत एकदा जाऊन माझे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण कर." आणि थोड्याच दिवसात वडिलांनी देह ठेवला, आई प्रेमकुंवर बाईनी थोड्याच दिवसांमध्ये इहलोकीची यात्रा संपविली. देविदासांच्या निधनानंतर राजसेवेचे कार्य अत्यंत तत्परतेने व निष्ठेने सेनानी

करू लागले. इतर वेळेत भजन-पूजन, कीर्तन, संतसमागम यामध्ये ते एकरूप होत. सेना पती-पत्नी घरी आलेल्यांचे अतिथ्यशील स्वागत करीत, तोच आपला परमात्मा मानीत. महाराष्ट्रातील अनेक वारकरी, उतर भारताची तीर्थयात्रा करून बांधवगड मागनि सेनाजींच्या घरी मुक्काम करीत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे संत, वारकरी, यात्रेकरी सेनार्जीच्या घरी मुक्काम करीत. सेनार्जीना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पूर्णपणे माहिती मिळत असे. त्यामुळे पंढरीच्या वारीची सेनाजींना अनिवार इच्छा होत असे; पण राजसेवेच्या बंधनामुळे वारी करता येत नव्हती.

राजा रामसिंहाच्या मृत्यूनंतर त्यांचा पूत्र वीरसिंह राजा झाला. तरुण राजा न्यायी, कडक शिस्तीचा, भडक स्वभावाचा तसा तो आत्मस्तुतिप्रिय त्यामुळे खुशमस्करे लोकांचा पगडा त्यांच्यावर सर्व बाजूने होता. राजाचा रोजचा कारभार लोकांच्या सल्लामसलतीने चाले; परंतु राजाची एक

--संकलन
--अतुल परब
--दिनांक-18.06.2025-बुधवार.
===========================================