दुःख

Started by शशि, August 01, 2011, 11:51:54 AM

Previous topic - Next topic

शशि

आपलंच दुःख आपल्याच हास्याच्या पडद्याआड लपवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला  काहीही....

amoul

khupach mast ............

dattajogdand

मनाला स्पर्श करायला लावनारि कविता