आरक्षण

Started by designer_sheetal, August 03, 2011, 06:53:41 PM

Previous topic - Next topic

designer_sheetal

आरक्षण हा आपल्या देशातला किती कळीचा मुद्दा आहे हे मला हल्लीच BEST मधे आलेल्या अनुभवावरून कळल. तरी बरं BEST ने बरयापैकी सीट्स आरक्षित ठेवल्या आहेत महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि अपंगांसाठी. जर प्रत्येकजण आप आपली जबाबदारी समजुन वागला तर आरक्षणाची गरजच नव्हती.

असो, तर त्यादिवशी बस नेहमी प्रमाणे बर्यापैकी भरली होती. बसायला जागा नव्हती आणि standing बरच होतं. एवढ्यात पुढच्या साइडला जिथे अपन्गांची सीट असते तेथून भांडणाचा आवाज यायला सुरुवात झाली. त्या अपन्गांच्या आरक्षित सीट वर एक ज्येष्ठ नागरिक, एक अपंग व्यक्ति बसले होते अन पुढल्या स्टॉप वर एक अंध व्यक्ति चढली. त्यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला की त्या अंध व्यक्तीला बसायला द्यायला सीट वरून उठणार कोण? खरं पहायला गेलं तर जे स्वताला ज्येष्ठ नागरिक म्हणवत होते ते सदगृहस्थ बर्यापैकी हट्टे कट्टे होते आणि सहज उभे राहू शकत होते, निव्वळ त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकत्वाच आयकार्ड होतं म्हणून त्याना तिथून उठायचं नव्हतं. शेवटी कोणीच तिथून उठलं नाही आणि बाजुच्या सीट वरच्या एका युवकाने त्या अंध व्यक्तीला बसायला जागा दिली. कोण बरोबर किव्वा कोण वाईट याचा उहापोह मला करायचा नाही पण माणसाने थोडा प्रसंगावधान राखून व थोड्या माणुसकीने वागले तर ते आपले व इतरांचे आयुष्यही सुकर करू शकतात. समाजात अशाच काही द्रुष्ट प्रवृत्ति असतात म्हणूनच लहानसहान गोष्टींमध्ये आरक्षणाची गरज भासते आणि आरक्षणाचा टक्का वाढत जातो जसा बसमध्ये पूर्वी २ लेडिज सीट्स होत्या आता ६ आहेत. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर स्त्रियांना बसायला देणं हा तर खरा कॉमन सेन्स आहे त्यासाठी कुठल्याही आरक्षणाची काय गरज आहे? हा तर खरा अलिखित नियम हवा.

असाच एक प्रसंग बस मधला

सकाळची वेळ होती. मी ऑफिसला निघाले होते, बसला फारशी गर्दी नव्हती. मला छान पैकी विंडो सीटही मिळाली होती. माझ्या बाजूला एक मुलगी बसली होती ती सिटीलाईटला उतरली अन तिथेच एक सदगृहस्थ चढले जे माझ्या बाजूला येवून बसले. काहीकाही लोकाना पसरून बसायची जाम वाईट्ट सवय असते. आपल्या बाजूला कुणीतरी बसलय याची शुद्धच नसते त्यांना. तर ते गृहस्थ आल्याआल्या भलतेच ऐसपैस बसले. मी थोडा वेळ वाट पाहीली की ते हातपाय आवरून बसतील पण व्यर्थ. मग मी त्यांना जरा त्रासिक मुद्रेनेच सांगितल की जरा सरकून बसा तुमचा हात लागतोय मला त्यावर तो माणूस माझ्यावरच ओरडला तुम्हाला जर त्रास होत असेल तर लेडिज सीटवर जाउन बसा.

किती स्वार्थी माणसं असतात जगात! मला गरज म्हणून मी लेडिज सीट वर जाउन बसायचं पण हा माणूस स्वताच वर्तन सुधारणार नाही. अशा समाजकंटकान्मुळेच आपल्या समाजाला आरक्षणा सारख्या कुबड्यांची गरज लागते. त्यावरही या लोकांची वर भुवई असते की यांना एवढ्या आरक्षणाची गरज काय? प्रश्नही त्यांनीच निर्माण केलेले अन त्यावर उत्तरही तेच. स्वताला सुधारा म्हणजे समाज आपोआप सुधारेल.


शीतल
http://designersheetal.blogspot.com