"स्तब्ध झाले शब्द ...!"

Started by msdjan_marathi, August 04, 2011, 06:10:14 PM

Previous topic - Next topic

msdjan_marathi

:'("स्तब्ध झाले शब्द ...!" :'(

स्तब्ध झाले शब्द माझे, स्तब्ध झाल्या भावना...
या स्थळी, या भूतळी गवसू कुठे तुला मी सांग ना...?
ढिम्म तन अन निंब मन हे, सुन्न झाल्या यातना...
शुष्कं झाली आसवेही शुष्कं झाल्या वेदना...
स्तब्ध झाले शब्द माझे, स्तब्ध झाल्या भावना...॥२॥

खिजवतो निष्टूर वारा, म्हणे अस्तित्व तिचे तू दावं ना...
ती कधी..., ती कुठे..., ती कशी... तुझ ठाव ना...
रात झाली, चांद आला, तारयांचीही वरती रांग ना...
आतुर होऊन शोधिले मी, तुझा तेथेही काही थांग ना...
स्तब्ध झाले शब्द माझे, स्तब्ध झाल्या भावना...॥२॥

मैफिल बसली, तान छेडिली पण गीत काही येईना...
दुभंगलेले मन हे माझे सुरास साथ देईना...
जोडूनी ओंजळ आता करितो पाषाणास त्या वंदना...
पाहुनीही हाल माझे ते दारही होई आप बंद ना...
स्तब्ध झाले शब्द माझे, स्तब्ध झाल्या भावना...॥२॥
                                                            ........महेंद्र :'(