मी ही अशी एकली.....

Started by Ashwinii Narsule, August 05, 2011, 03:44:12 PM

Previous topic - Next topic

Ashwinii Narsule

मी ही अशी एकली.....

रुंद एकल्या वाटेवरी एकटेच चालायचे आहे मला
कोणाच्या ही साथीची अपेक्षा नाही मला
डोक्यावरच्या कडक उन्हाला एकटेच सहन करायचे आहे मला
प्रेमाच्या सावालीची अपेक्षा नाही मला
आकाशातला चंद्र तारका सोबत असून ही जसा एकटा असतो
तसेच सर्वासोबत असूनही एकटे राहायचे आहे मला
सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत मला
पण कोणाकडून ही अपेक्षा नाही मला
सगळ्याची स्वप्ने पूर्ण करायची आहेत मला
पण स्वताच्या स्वप्नांचा विचार ही नाही करायच मला
मरता येत नाही म्हणून आयुष्य जगायचे आहे मला
आणि मरत मरत असेच जगायचे आहे मला

अश्विनी नरसुले

mahesh4812



santoshi.world



शशि

खूपच छान .....आवडली