---- तशी बात येते ----

Started by सूर्य, August 06, 2011, 12:11:07 PM

Previous topic - Next topic

सूर्य

कधी सांज ढळते  ,कधी रात होते
दिव्याच्या प्रकाशी तशी बात येते ...

मनाच्या तळाशी , राहिले न काही
पाणी येता डोळा सारे, सारे सांगी जायी
आठवण तुझी येता , अनिवार्य मन होते ..

पाखरांची रांग , जाते रे निजेला
उन सावल्या ही येती येती रे उशाला
मनोमन हसून , सारे काही जागे होते ..

देह माझा खोटा , मन खोटे नाही
जुन्या ओळखिची  नव नव लाई
मुक्यानेच प्रीत माझी तुला बोलाविते

ज्ञानदीप सागर ...