---- पाहतो तुला मी -----गडे ...पाहतो तुला मी चहुकडे चहुकडे आज रातराणीचा सुगंध द

Started by सूर्य, August 06, 2011, 12:11:36 PM

Previous topic - Next topic

सूर्य

गडे ...पाहतो तुला मी चहुकडे चहुकडे
आज रातराणीचा सुगंध दरवळे...

तु मला भेटता स्वप्न वाटे खरे
तु मला स्पर्शिता अन् वाटे बरे
भेटलीस... तु जरि, आहेत अडखडे...

प्रीत माझी खरी हा विसावा खरा
येथल्या धुंद राती राहती घरा
पावले ..का चालती तुझ्या कडे...

सैल होता तुझी ही मिठी जरा जराशी
चंद्र जातो निजेला आभाळी उशाशी
सांगना ..स्वप्न माझे तुला कसे आवडे...

तु येण्याचा होता आभास हा
तु असण्याचा होता जरि भास हा
प्रेम हे ..ना समझे ना  कधी उलगडे...

ज्ञानदीप सागर...