नाते - ज्ञानेश कुलकर्णी

Started by sachin Tamboli, August 07, 2011, 08:41:09 AM

Previous topic - Next topic

sachin Tamboli

तुझ्या आणि माझ्या नात्यात, होता एक आगळेपणा
दोघांना हि नाही कळला हाच त्याचा वेडेपणा.

नाते जुळले अलगद , जसे  थेंबाचे मोती व्हावे
शिम्पल्यातुनी उचलुनी त्याला मायेने कवटाळावे

नात्याची त्या चाहूल नव्हती, होते विभिन्न सारे
भिन्न असूनही वाऱ्यासंगे मन हि  वेडे वारे

नाते मग ते फुलले जणू,बहर  प्राजक्ताचा
आसमंती या दरवळू लागला, गंध ह्या नात्याचा

नात्याला त्या  भीती नव्हती, कुणा जीवनाची
अल्लड अवखळ सतत राहिले, तमाही न कशाची

त्या नात्याला दृष्ट लागली, भलतेच घडले सारे
तुझ्या माझ्या नात्यातले क्षण, विरून गेले सारे .
ज्ञानेश कुलकर्णी


केदार मेहेंदळे


राहुल

छान जमली आहे कविता. गुड लक.