आठवण तुझी आल्यावर

Started by mrralekar, August 08, 2011, 12:37:44 AM

Previous topic - Next topic

mrralekar

आठवण तुझी आल्यावर, मन माझे स्वतः शिच बोलत बसते,
सागल्या मध्ये असून सुद्धा, एकटे मज करून जाते,
जसे वाऱ्या संगे, खोल दरीत उतरून जाते,
तर कधी उडता उडता ढगान मध्ये निसटून जाते,

तू सोबत नसतेसच,
पण मन वेडे, तू असल्याचा आभास मज करून जाते,
तू असशीलही कुठे तरी,
म्हणून कदाचित मन वेडे सगळी कडे भटकत राहते.

तू कोण? कुठली? कशी?
मन माझे स्वतःला विचरत बसते,
आणि याच प्रश्नाचा शोधात ते भटकत राहते.


By Mehar R Ralekar