सांगायचे होते तुला काही....

Started by tsk007, August 09, 2011, 08:25:28 PM

Previous topic - Next topic

tsk007

सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तू माझी लैला.. मी तुझा मजनू
तू माझी राधा.. मी तुझा कृष्ण
प्रेमाला काव्यात गुंफण्याचे
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसरतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.
                  - tsk007

sindu.sonwane

तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
                 Khup Chhan






manoj vaichale

तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.
खूपच आवडली


Madhu143

Manatale Ekda Tari Bolayala Have Hotes...
By the way nice poem..