" अंगणी,श्रावण बरसला...!"चारुदत्त अघोर.(९/८/११)

Started by charudutta_090, August 10, 2011, 09:42:33 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
" अंगणी,श्रावण बरसला...!"©चारुदत्त अघोर.(९/८/११)
आज एक नवा ऋतू,मनी गवसला,
होता प्रणयीत भावनेने,आधीच नवसला;
तिला चाहुली कल्पनून,चित्ती तरसला;
आज माझ्या अंगणी,श्रावण बरसला...!

उनं शांतवून,हिरव्या दिनी दिवसला,
मदनी मजला जागवून,बाणी हवसला;
रोजचं रूप हरवून,नव्या रुपी आरसला;
आज माझ्या अंगणी,श्रावण बरसला...!
 
आगळाच गरा रसाळून,काटी फणसला,
शहारून मदनबाणी,ताठवून कणसला;
ओठी रस गाळून,तोंडी काव्य रसरसला;
आज माझ्या अंगणी,श्रावण बरसला...!

कुठली मादक वासना,जागवून पावसला,
रसाची रसना धुंदावून,शुद्धीच अमावसला;
स्वप्नीच तिला मिठावून,विळखून पाठी परसला;
आज माझ्या अंगणी,श्रावण बरसला...!

दोघांच्याच दुनियेत,हरवून घुमसला,
तिच्या मांडी डोकावून,कुशी धुमसला;
यौवन रस सोशून,मधु चंद्री सुरसला,
आज माझ्या अंगणी,श्रावण बरसला...!

दुधाळ थेंबी ठीबकावून,गुलाबून ओजसला,
आज आगळ्या चमकेनी चेहेरा,कांती तेजसला;
तारुण्याची चाहूल देत,नव्या ओळखी गोरसला;
आज माझ्या अंगणी,श्रावण बरसला...!
चारुदत्त अघोर.(९/८/११)