यंदाच्या पावसात एवढंच कर.

Started by amoul, August 10, 2011, 10:45:16 AM

Previous topic - Next topic

amoul

मला नेहमी असं वाटत असतं कि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या काही स्वच्छ जागेवर लोकंच घाण करायला सुरुवात करतात आणि मग ती जागा स्वच्छ, पवित्र होती यावर विश्वासच बसेनासा होतो, तसंच काहीसं आता समाजात स्त्रिया, मुली यांबरोबर झालंय(यात माझी बहिणही आलीच), पूर्वी कसं शिकवलं होतं त्या रुपात आई, मावशी, आत्या ,ताई, नाहीतर मैत्रीण पण आता सर्रास item ,  फटाका, माल, छामिया असं  बोललं जातं, बघितलं जातं. असं रोज उंबऱ्यातून बाहेर  पडल्यावर ते परत उंबऱ्यापर्यंत  येई पर्यंत(रस्ता -नाका-रिक्षा-स्टेशन -जिना -लिफ्ट-office - आणि पुन्हा return )  तुम्हालाही ऐकायला मिळत असेलच, चीडही येत असेल, म्हणून माझा गाऱ्हाणं त्या पावसाला आहे कि बाबा तुझ्याशिवाय आता या सगळ्यांवर चढलेली हि घाणीची आवरणं धुण्याची शक्ती इथे कुठल्याच पुजार्यात नाही ,कुणातच नाही तुच यांना पवित्र अभिषेक घाल आणि पुन्हा आम्हाला या देवीत आमची आई, ताई, मावशी, मैत्रीण आहेच पण दाखव सुद्धा. (काही शब्द चुकले असतील तर कृपया माफ करा हि नम्र विनंती.) ...
.
.
.
पण त्यासाठी फक्त तू यंदाच्या पावसात एवढंच कर


यंदाच्या पावसात एवढंच कर,
घराबाहेर पडून भिजून घे अंगभर.

पावसाच्या तीव्र माऱ्यातून,
निघून जाऊदेत तुझ्यावरल्या खपल्या,
लोचट नजरेच्या कामुक स्पर्शाच्या,
ज्या लाचारीस्तव होत्या जपल्या.
आणि दिसू देत पूर्वीसारखी त्यातून,
तीच निरागस पवित्र मूर्ती,
अंतरबाह्य निर्मळ बेकलंक अशी,
जशी समाजात येण्यापूर्वी होती.
अंगावरली मलीनतेची प्रावरणं,
धुण्यासाठी घे तो पाऊस अंगावर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

भिजताना ती अंगावरली,
ओढणी सारून ठेव बाजूला,
तीही आता थकली असेल,
त्या नजरांपासून वाचवून तुला.
आणि रुंद कर ती छाती जरा,
तीही स्वच्छ घे त्यात धुऊन,
भडव्यांची नजर तिथंही असते,
भूक भागवली दुध जिथना पिऊन.
त्वचेवरल्या रंध्रारंध्रात त्या,
शुद्ध पावसाचे थेंब भर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

पुन्हा तू बाहेर पडशील,
तेव्हा होणारच पुन्हा तसं,
पण त्यापासून वाचण्याच,
तुलाच जमवायचंय धाडस.
कधी सहानुभूती कधी आमिष,
तर कधी वेगळंच भासवतील काही,
तूच सावरायचं तुला त्यातून,
पण अजिबात घाबरायचं नाही.
त्या अस्पृश्य नजरेंनी दिलेल्या घावांचा ,
या पावसात होऊ दे विसर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

मला माहित आहे जरी,
तुला आलाय पार कंटाळा,
पण असंच जगायला शिकवते,
हि जगण्याची शाळा.
तुला जरी असह्य झाल्यात,
या पदोपदी बोचऱ्या नजरा,
मनातलं दुखं मनात ठेऊन,
करायचा दिवस साजरा.
बापाच्या मायेने आलाय हा पाऊस,
त्याच्या कुशीत मन मोकळं कर.
यंदाच्या पावसात एवढंच कर.

.......अमोल